वाहतूक कोंडीतून “मार्ग’ निघणार

राजगुरूनगर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गवरील खेड (राजगुरूनगर) शहर बाह्यवळण (4.981 किमी), मंचर शहर बाह्यवळण व मंचर ते एकलहरे पर्यंत महामार्ग (8.476 किमी) यांसह पेठ (680 मीटर) आदि महामार्ग चौपदरीकरण कामाची 216 कोटी 58 लाख किमतीची निविदा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या सन 2012-13 या दोन वर्षांच्या पाठपुराव्यामुळे रामा 50 खेड ते सिन्नर महामार्गाच्या 138 किमी लांबीच्या 1348 कोटी रकमेच्या चौपदरीकरण कामास मंजुरी मिळाली. हे काम केंद्र सरकारचे नियंत्रण असणाऱ्या आयएलएफएस या कंपनीला फेब्रुवारी 2014मध्ये देण्यात आले. या कामासाठी ऑगस्ट 2017 पर्यंतची मुदत निश्‍चित करण्यात आली होती.

कंपनीकडून 2017 पर्यंत सर्व कामे व्यवस्थित सुरु होती; मात्र 2017मध्ये बाह्यवळण रस्त्यांचे भूसंपादन व्यवस्थित न झाल्यामुळे बाह्यवळणांची कामे सुरु होऊ शकली नाहीत. त्यातच 2017मध्ये आयएलएफएस ही कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून कंपनीला दिलेले महाराष्ट्रातील 20-22 प्रकल्प बंद पडले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून लोकसभेत याविषयी महत्वाचा मुद्दा उपस्थित करुन आयएलएफएस कंपनीला या प्रकल्पातून डिस्कोप करण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास भाग पाडले. तसेच या सर्व बाह्यवळण कामांसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here