पुणे – खडकवासला धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग कमी केला आहे. धरणातून 18 हजार 491 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. दरम्यान, रात्री उशीरा विसर्ग आणखी कमी करून 9,416 क्युसेक करण्यात आला आहे. यामुळे मुठा नदीपात्रातील पाणी कमी झाले असून काही दिवसांपासून पाण्याखाली असणारा भिडे पूलाचे आज दर्शन झाले आहे. परंतु पाणी ओसरल्यानंतर भिडे पुलावर पुराने वाहुन आलेला कचरा मोठ्या प्रमाणात अडकलेला दिसत आहे.
असंख्य बेशिस्त पुणेकर नदीमध्ये कचरा, निर्माल्य फेकतात. हे निर्माल्य आणि मोठ्या प्रमाणावर जलपर्णी पुलाच्या कठड्यांना अडकली आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून रोगराई पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.