तिघे अटकेत : अनैतिक संबंधातून खुन झाला असल्याची चर्चा
नगर – शेवगाव शहरातील पाथर्डी रोडवरील आयटीआय समोरील मोकळ्या जागेत एकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी (दि.8) रोजी उघडकीस आली. या घटनेचा शेवगाव पोलिसांनी तीन तासात छडा लावला असून, तीन आरोपी ताब्यात घेतले आहे.
बाणुसाहेब एकनाथ धनवट (वय-37 रा. म्हसोबा नगर, ता. शेवगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत शेवगाव पोलिसांनी आरोपी कृष्णासिंग पुनमसिंग भोंड (वय- 22), परमेश्वर पुनमसिंग भोंड (वय-19), लक्ष्मण किसन कांबळे (वय-30, तिघे रा. रामनगर, ता. शेवगाव) यांना ताब्यात घेतले आहे.
पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना मिळालेल्या माहितीनुसार हा खुन अनैतिक संबधातून झाला असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार खुनाचा तपासाची सुत्र ढिकले यांनी हलविली. त्यानुसार हा खुन कृष्णासिंग भोंडे, परमेश्वर भोंडे, लक्ष्मण कांबळे यांनी केला असल्याचे समोर आले.
पोलीस निरीक्षक ढिकले यांनी दोन पथके तयार करून सहायक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक भरत काळे, सोपान गोरे, पोलीस नाईक राजु चव्हाण, राजेंद्र केदार, प्रवीण बागुल, वसुदेव डमाळे, राजेंद्र नागरगोजे, संदीप दरवडे, सोमनाथ सोनटक्के, किशोर शिरसाठ, अभय लबडे, बाळासाहेब नागरगोजे, अमोल ढाळे यांच्या पथकाने आरोपीस सापळा रचवून ताब्यात घेतले. त्यांनी धनवट यांला लोखंडी रॉडने जबर मारहाण करून त्याच्या अंगावर गवत टाकुन प्रेत लपविले असल्याचे सांगितले. याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.