मुंबई – शाहरुख खानने ‘पठाण’ चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर दमदार पुनरागमन केले आणि पठाणने जगभर धुमाकूळ घातला. आज या चित्रपटाला प्रदर्शित होऊन एक ते दोन महिने झाले आहेत. शाहरुख खानच्या या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींच्या कलेक्शनचा टप्पा पार केला असून, एक इतिहास घडवला आहे.
हा टप्पा गाठणारा तो एकमेव हिंदी चित्रपट ठरला आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट चांगलाच आवडल्यामुळे बॉक्स ऑफिसवर पठाणचा जलवा पाहायला मिळाला आहे. पठाण चित्रपटात अभिनेता शाहरुख खान, जॉन अब्राहम आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण अशी तगडी स्टारकास्ट सिनेरसिकांना पाहायला मिळाली.
दरम्यान, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केल्यानंतर आता हा चित्रपट टेलिव्हिजनवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘स्टार गोल्ड’वर या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होईल. स्टार गोल्डच्या इंस्टाग्राम ऑफिशियल अकाउंटवर ही माहिती शेअर करण्यात आली आहे. यासोबतच तारीख आणि वेळही नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता अवकरच तुम्हाला हा चित्रपट घरबसल्या पाहता येणार आहे.
View this post on Instagram
अवघ्या जगाला हादरवणारा ‘पठाण’ चित्रपटाचा अभिनेता शाहरुख खान या चित्रपटाद्वारे तब्बल 4 वर्षांनंतर चित्रपटात परतला आहे. हा चित्रपट दि. 18 जून रोजी रात्री 8 वाजता स्टार गोल्डवर पाहायला मिळणार आहे. स्टार गोल्डने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर म्हंटलं आहे की, “पठाण की धमकेदार मेहमान नवाजीच्या स्वागतासाठी सज्ज व्हा, सर्वात मोठा ब्लॉकबस्टर प्रीमियर होणार आहे आणि आम्ही देखील प्रतीक्षा करू शकत नाही..’ असं कॅप्शन दिल आहे.