पुणे: एमएसएलटीए योनेक्स सनराईज अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशिप सिरीज 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात बिगर मानांकित अरिंदम बीटने, तर मुलींच्या गटात अव्वल मानांकित संजीवनी कुतवळने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
मेट्रोसिटी स्पोर्टस क्लब, आयडियल कॉलनी, कोथरूड येथील टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात बिगर मानांकित अरिंदम बीटने तिसऱ्या मानांकित ईशान गोदभरलेचा 9-6 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. अव्वल मानांकित संजीवनी कुतवळने सातव्या मानांकित पूर्वा भुजबळचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
पाचव्या मानांकित आर्यन कोटस्थाने याने विक्रम अरभट्टीचा 9-5 असा तर आर्यन हुडने जय पवारचा 9-4 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुलींच्या गटात बिगर मानांकित काम्या परबने तिसऱ्या मानांकित ऐश्वर्या कुमारचा 9-3 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. अव्वल मानांकित संजीवनी कुतवळने सातव्या मानांकित पूर्वा भुजबळचा 9-1 असा तर आशी छाजेडने लोलाक्षी कांकरीयाचा 9-5 असा व गार्गी फुलेने गार्गी शहाचा 9-3 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
सविस्तर निकाल:
मुले : उपांत्यपूर्व फेरी : आर्यन हुड वि.वि जय पवार 9-4, अरिंदम बीट वि.वि ईशान गोदभरले (3) 9-6, आर्यन कोटस्थाने (5) वि.वि विक्रम अरभट्टी 9-5
मुली : संजीवनी कुतवळ (1) वि.वि पूर्वा भुजबळ (7) 9-1, आशी छाजेड वि.वि लोलाक्षी कांकरीया 9-5, काम्या परब वि.वि ऐश्वर्या कुमार (3) 9-3. गार्गी फुले वि.वि गार्गी शहा 9-3.