न्यूयॉर्क – अॅटम शॉ आणि अंबर ट्रामोन्टाना या दोघी जुळ्या बहिणी. त्यांना दोन मुली झाल्या त्या त्यांच्या दोघींच्या वाढदिवशी. अगदी एकाच दिवशी, एकाच हॉस्पिटलमध्ये. फक्त 90 मिनिटांच्या अंतराने. 29 ऑक्टोबर रोजी दोघींना कन्यारत्न प्राप्त झाले.
तेनेसी नॉक्सविले येथे राहणाऱ्या या बहिणींना याआधी मुलगे झाले आहेत. तेव्हा मात्र हे मुलगे दहा आठवड्यांच्या फरकांनी जन्माला आले. आता ते दोन वर्षांचे आहेत.
त्या म्हणतात, जुळ्या बहिणी म्हणून आम्ही ज्या गोष्टींचा आनंद घेतला, अनुभव घेतले ते आमच्या मुलांना मिळावेत अशी आमची इच्छा आहे. त्यामुळेच अपत्यांचे जन्म साधारण सारख्या वेळी होतील यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. पण त्यासाठी आम्ही फार काही नियोजन केले नाही.
या जुळ्या बहिणींमधील सातत्य मुलींच्या जन्मापर्यंत थांबत नाही. लहानपणापासून त्यांच्याबाबत अनेक गोष्टी सारख्याच घडल्या आहेत. दोघींचे वागणे आणि व्यक्तिमत्वही साधारणपणे सारखेच आहे. एक फरक आहे आणि तो म्हणजे अंबर नॉक्सविले येथे राहते आणि प्रसूती व कर्करोग विभागात परिचारिका म्हणून काम करते.
अॅटम मॉरिसटाऊन येथे राहते आणि अपघात व सांधेदुखी विभागात काम करते. आम्ही जे करिअर आणि त्यातील विशेष क्षेत्र निवडले त्यातून आमचे व्यक्तिमत्व प्रकट होते, असे अंबर म्हणते.
अॅटमच्या मते, अंबर ही सगळे काही नियोजनपूर्वक करते. त्यामुळे ती ए प्रकारातील आहे आणि मी मात्र प्रवाहाबरोबर जाणारी बी प्रकारातील आहे आणि त्यामुळेच आमच्यात सगळे काही सुरळीत घडते. 2018 मध्ये जुळ्या बहिणींना मुलगे झाले. मात्र त्यांच्यामध्ये दहा महिन्यांचा फरक आहे.
असे असले तरी दोघांची उंची, शारिरिक ठेवण सारखीच आहे, असे अंबर सांगते. मात्र यावेळी दोघींनी एकाच दिवशी केवळ 90 मिनिटांच्या अंतराने मुलगी होणे यामागे दैवीयोग असल्याचे तिचे म्हणणे आहे.