मेलबर्न : वर्षातील पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष एकेरीच्या सामन्यांमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला खेळाडू नोव्हाक जोकोविचच्या खेळाण्यावर अजूनही शंका आहे. कोविड लसीकरणाचा खुलासा न करण्यावर ठाम असलेल्या जोकोविचला सुरुवातीला टेनिस ऑस्ट्रेलियाने स्पर्धेत खेळण्याची परवानगी दिली होती, परंतु मेलबर्न विमानतळावर आल्यानंतर ऑस्ट्रेलियन बॉर्डर फोर्सने जोकोविचचा व्हिसा रद्द केला.
या संपूर्ण घटनेविरोधात जोकोविचने सोमवारी स्थानिक न्यायालयात दाद मागितली आहे.
जोकोविचला क्वचितच खेळण्याची परवानगी मिळेल, असे जाणकारांचे मत आहे. अशा परिस्थितीत, 17 जानेवारीपासून सुरू होणार्या या स्पर्धेत गतविजेता जोकोविच खेळला नाही, तर कोणता खेळाडू ही स्पर्धा जिंकू शकतो, याचा अंदाज जगभरातील टेनिस चाहते लावत आहेत.
अशात या स्पर्धेत सहभागी होणारा दिग्गज राफेल नदाल, जागतिक टेनिस क्रमवारी दुसर्या स्थानी असलेला रशियाचा डेनिल मेदवेदेव आणि तिसर्या क्रमांकावर असलेला जर्मनीचा अॅलेक्झेंडर ज्वेरेव या तिघांमध्ये स्पर्धेचे जेतेपद पटकावण्यासाठी चुरस असणार आहे.
1) राफेल नदाल
राफेल नदाल हे टेनिस विश्वातील एक असे नाव आहे ज्याच्या खेळाने जोकोविच आणि फेडररसह इतर खेळाडूंवर वर्षानुवर्षे वर्चस्व गाजवले आहे. सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या बाबतीत नदाल, रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोविचच्या बरोबर अव्वल स्थानी आहे. 35 वर्षीय नदालने एकूण 20 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत, त्यापैकी त्याने क्ले कोर्टवर विक्रमी 13 वेळा फ्रेंच ओपनचे विजेतेपद जिंकले आहे, त्यामुळे स्पॅनिश खेळाडूला क्ले ऑफ क्ले किंग असेही म्हटले जाते.
नदाल गेल्या वर्षी डाव्या पायाच्या दुखापतीने झगडत होता. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत नदालला पराभवाला सामोरे जावे लागले होते. 2009 मध्ये नदालने कारकिर्दीतील एकमेव ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले होते. अशा स्थितीत जोकोविचच्या अनुपस्थितीत नदाल ऑस्ट्रेलियन ओपन जिंकू शकतो. असे झाल्यास पुरुष एकेरीत त्याच्याकडे सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदे असतील.
2) डॅनिल मेदवेदेव
जागतिक टेनिस क्रमवारीत दुसर्या स्थानी असलेला रशियाचा टेनिसपटू डॅनिल मेदवेदेवचा गेल्या वर्षी 2021 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत जोकोविचचा सामना झाला होता. अंतिम फेरीत तो हरला असला तरी जोकोविचच्या अनुपस्थितीत त्याचा खेळ मजबूत होईल अशी अपेक्षा आहे.
2021 मधील वर्षातील शेवटच्या ग्रँड स्लॅम यूएस ओपनच्या अंतिम फेरीत डॅनिल मेदवेदेवने जोकोविचचा पराभव करून त्याचे कॅलेंडर स्लॅम पूर्ण करण्याचे आणि सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळवले होते. मेदवेदेवच्या कारकिर्दीतील हे पहिले ग्रँडस्लॅम जेतेपदही होते. मेदवेदेव जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि 24 वर्षीय खेळाडूला त्याची पहिली ऑस्ट्रेलियन ओपन जिंकण्याची मोठी संधी आहे.
3) अलेक्झांडर झ्वेरेव्ह
जागतिक क्रमवारीत तिसर्या क्रमांकाचा टेनिसपटू जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेवने अलीकडच्या काळात अप्रतिम खेळ करत प्रतिस्पर्ध्यांसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. झ्वेरेवने 2018 मध्ये वयाच्या 21 व्या वर्षी एटीपी फायनल्स जिंकून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. 2021 मध्येही त्याने एटीपी फायनल्समध्ये गतविजेत्या मेदवेदेवचा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले होते. एवढेच नाही तर झ्वेरेवने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीत सुवर्णपदकही जिंकले आहे.
गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत झ्वेरेवचा जोकोविचकडून पराभूत झाला होता. झ्वेरेव गेल्या 6 महिन्यांपासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, त्याने गेल्या वर्षी यूएस ओपनमध्येही उपांत्य फेरी गाठली होती. ऑस्ट्रेलियन ओपनच्या रूपाने झ्वेरेव आपले पहिले ग्रँडस्लॅम जिंकण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल यात शंका नाही.