पुणे – इयत्ता दहावी, बारावी परीक्षेसाठी अतिविलंब शुल्कासह खासगीरित्या फॉर्म नंबर 17 भरण्यासाठी 12 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली.
यापूर्वी 16 सप्टेंबर ते 18 डिसेंबर अशी मुदत होती. तसेच, अतिविलंब शुल्कासह अर्ज नोंदणीसाठी 5 जानेवारीपासून सुविधा उपलब्ध झाली होती. विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, स्वत:चा पासपोट आकारातील फोटो स्वत:जवळ ठेवावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज भरताना कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागणार आहेत. विद्यार्थ्यांचा मोबाइल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे. पात्र विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्वरीत परीक्षेपूर्वी समक्ष विभागीय मंडळात सादर करणे आवश्यक राहणार आहे, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले.