आपल्याकडे बॉलीवूडच्या कलाकारांना पाहण्यासाठी रस्त्यांवर किंवा विविध ठिकाणी किती आणि कशी झुंबड उडते हे सर्वांनाच माहीत आहे. अनेक जण कलाकारांभोवती गराडा घालणाऱ्या चाहत्यांना पाहून नाकंही मुरडताना दिसतात. तसेच ही मंडळी “हॉलीवूडमध्ये किंवा परदेशात असं नसतं’ अशी शेरेबाजीही करताना दिसतात.
View this post on Instagram
Dubai you were fantastic. Thanks to everyone who came out! Even in the 30 degree heat!! ? @ronanpark
पण वाचकहो, तसं मुळीच नाही. कलाकार मग ते टॉलीवूडमधील असोत, बॉलीवूडमधील असोत किंवा हॉलीवूडमधील; त्यांना पाहण्यासाठी, भेटण्यासाठी, हस्तांदोलन करण्यासाठी हजारो-लाखो रसिक चाहते आसुसलेले असतात. चाहत्यांचे हे प्रेम इतके असते की बरेचदा त्यामुळे कलाकारांना वैयक्तिक आयुष्य राहात नाही. अलीकडेच प्रख्यात ब्रिटिश गायिका रिटा ओराने याबाबत भाष्य केले आहे.
खूप लोकप्रिय असल्यामुळे बाहेर जाऊन साधी कॉफी पिण्याची हौसही भागवू शकत नाही, कारण लगेच लोक येऊन गराडा घालतात, असे सांगत आपल्याला असलेल्या लोकप्रियतेविषयी एक प्रकारची खंतच रिटाबाईंनी व्यक्त केली आहे. लंडनमध्ये सुरू झालेल्या ” द मास्कड् सिंगर’ या नव्या कार्यक्रमाच्या लॉंचिंगसाठी ही 29 वर्षीय गायिका आली असता तिथे विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना तिने हे विधान केले आहे.
तसेच जर मी प्रसिद्ध गायिका नसते आणि एक सर्वसामान्य मुलगी असते तर दिवसभर रस्त्यांवरून भटकणे आणि कॉफी हाऊसमध्ये जाणे या गोष्टी मला सहज करता आल्या असत्या; आता त्या करता येत नाहीत असेही रिटा सांगते. स्टारडम, ग्लॅमर यांच्याविषयी इतकी नाकं मुरडण्याची हल्ली फॅशनच आली आहे हेच रिटासारख्या कलाकारांच्या अशा विधानांवरून दिसते.