व्यापारातील तूट सहा महिन्यांच्या उच्चांकावर

नवी दिल्ली – मे महिन्यात आयात बऱ्यापैकी म्हणजे 3.93 टक्‍क्‍यांनी वाढून 30 अब्ज डॉलरची झाली आहे. इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि केमिकल क्षेत्रातून निर्यात वाढली. मात्र, त्याबरोबरच आयातही 4.31 टक्‍क्‍यांनी वाढून 45 अब्ज डॉलरवर गेल्यामुळे व्यापारातील तूट 15 अब्ज डॉलरवर गेली आहे.

नोव्हेंबर 2018 पासून व्यापारातील तूट प्रथमच एवढ्या पातळीवर गेली आहे. इलेक्‍ट्रॉनिक्‍स क्षेत्रात 51 टक्के, अभियांत्रिकी क्षेत्रातील निर्यातीत 4 टक्के, रसायन क्षेत्रातील निर्यातीत 20 टक्के, औषधी क्षेत्रातील निर्यातीत 11 टक्के तर चहा निर्यातीत 24 टक्के वाढ झाली आहे.

त्याचबरोबर क्रूड तेलाची आयात 8 टक्‍क्‍यांनी वाढूून 12 अब्ज डॉलरवर गेली आहे. या महिन्यात सोन्याची आयात 37 टक्‍क्‍यांनी वाढली व जवळजवळ 5 अब्ज डॉलरचे सोने आयात केले गेले. एप्रिल ते मे यादरम्यान निर्यात केवळ 2.37 टक्‍क्‍यांनी वाढली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.