इलेक्‍ट्रिक बाइकची मागणी वेगाने वाढणार

मुंबई – भारतातील इलेक्‍ट्रिक बाइकची मागणी वेगाने वाढणार आहे. त्या दृष्टिकोनातून भारतात ई बाइक तयार करणाऱ्या कंपन्या नेटाने प्रयत्न करीत आहेत, असे मोबिलिटी या ई-बाइक तयार करणाऱ्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत कुमार यांनी सांगितले.

ते म्हणाले की, आम्ही जेव्हा बाईक भारतात सादर केल्या त्यावेळी कमी प्रतिसाद होता. मात्र, सरकारने याबाबत चांगली वातावरण निर्मिती केली आहे.त्याचबरोबर नागरिकांनाही पर्यावरण संतुलित ठेवणारी वाहने आवडू लागली आहेत. कंपनीने जॉंन्टी आणि इन्स्पायर ही वाहने त्याचबरोबर फिएसस्टी आणि स्पिन ही वाहने बाजारात सादर केली आहेत. या वाहनाच्या इंधनाचा खर्च प्रत्येक किलोमीटरला केवळ 30 पैसे येतो असा दावा त्यांनी केला. आम्ही भारतभर या बाईकसाठी शोरूम उघडत असून याला ग्राहकाकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातही वितरण वाढविण्यात येत असून विदर्भाबरोबरच पुण्यातही वितरण केंद्र सुरू केले आहे असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.