नवी दिल्ली : देशात मागील काही दिवसांपासून सनातन धर्म आणि त्यावर होणाऱ्या टीकेने जोर धरला आहे.तामिळनाडूचे युवक कल्याणमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने हा सगळा गोंधळ सुरु झाला आहे. दरम्यान, यावर अनेकांनी टीका केली आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्र्यांनी या विषयात उडी घेत चक्क उदयनिधी यांना धमकीच दिली आहे.
केली आहे. राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यात एका पोटनिवडणुकीदरम्यान भाजपच्या परिवर्तन यात्रेतील शेखावत यांच्या भाषणा केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी हा धमकीवजा इशारा दिला आहे. त्यांनी या कार्यक्रमात बोलताना,”सनातन धर्माच्या विरोधात बोलणाऱ्यांची जीभ हासडू आणि सनातनकडे वटारले जाणारे डोळे उपटून काढू, अशा अशोभनीय भाषेचा वापर केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
शेखावत यांनी, “स्टॅलिन यांचे हे आव्हान आम्ही स्वीकारतो. आमची संस्कृती आणि इतिहासावर केलेले हे आक्रमण आहे. सनातन धर्माविरोधात बोलणारी कोणतीही व्यक्ती या देशात राजकीय आणि सत्तास्थानी राहू शकत नाही” असे म्हटले आहे. या भाषणात त्यांनी विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीवरही टीका केली. एवढेच नाही तर मोदी पुन्हा जिंकले तर सनातन धर्म ताकदवान होईल, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाल्याचा दावा शेखावत यांनी केला.
गेल्या दोन हजार वर्षांत अल्लाउद्दीन खिल्जी, औरंगजेब यांच्यासारख्या अनेक आक्रमकांनी देशाची संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र आपल्या पूर्वजांनी ही संस्कृती जपली. या पूर्वजांची शपथ घेऊन सनातन धर्मावरील हल्ला खपवून घेणार नसल्याचे शेखावत म्हणाले. दरम्यान, शेखावत यांची भाषा दहशतवाद्यांसारखी आहे, अशी टीका काँग्रेस नेते रशिद अल्वी यांनी केली आहे. अशी भाषा वापरणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांवर कारवाई केली जावी, अशी मागणीही त्यांनी केला. त्याच वेळी अल्वी यांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माबाबत विधानाचाही निषेध केला.