मेलबर्न – करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबरमध्ये होत असलेली टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा लांबणीवर जाणार असल्याचे संकेत आयसीसीने दिले आहेत. याबाबत येत्या काही दिवसात लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
यंदाच्या मोसमात होणारी ही सर्वांत मोठी स्पर्धा आहे. करोनाचा धोका अद्याप कायम राहिल्याने ही स्पर्धा देखील अनिश्चिततेच्या गर्तेत अडकली आहे. त्यातच ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाला करोनामुळे प्रचंड नुकसान झाले असून ही स्पर्धा पुढे गेली तर त्यात भरच पडणार आहे. अर्थात, ही स्पर्धा स्थगित केली गेली व भारतीय संघाचा ठरलेला ऑस्ट्रेलिया दौरा निश्चित झाला तरीही त्यांचे नुकसान काही प्रमाणात भरून निघणार आहे.