पुणे : सोशल मीडियावर सध्या पुणे पोलीस यांच्या अधिकृत अकाउंटवरील ट्विट चांगलेच चर्चेत आहे. या ट्विटला ट्विटर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. पुणे ट्राफिक पोलिसांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नशा न करु नका, असं सागणारं पुणे पोलिसांचं ट्वीट व्हायरल झालं होतं. त्यामध्ये पुणे पोलिसांच्या क्रिएटीव्हीटीचं अनेकांनी कौतुक केलं होतं. आता पुणे पोलीस पुन्हा एकदा चर्चेत आहेत.
@PuneCityPolice pic.twitter.com/iF5rZ23Vj6
— Pankaj (@Pankaj91187527) January 7, 2020
दरम्यान, पुणे पोलिसांना ट्विटरवर फोटो शेअर करत ट्विट केले आहे की,’दुर्दैवाने राजा साहेबांना लवकरच चालानने पुरस्कृत केलं जाईल’. शेअर केलेल्या फोटोत स्कूटरवर जी नंबर प्लेट लागली होती, त्यावर एक छोटासा क्राऊन म्हणजेच मुकूट बनलेलं होतं. यानंतर पुणे पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा फोटो रिट्वीट केला आहे. या ट्विटला ट्विटर युजर्सकडून लाईक आणि कंमेंटचा वर्षाव होत आहे.