नवी दिल्ली – नागरिकत्व कायदा आणि एनआरसीविरोधात सध्या देशभरात आंदोलने चालू आहेत. यामुळे जगभरात भारताच्या धर्मनिरपेक्षता प्रतिमेला धक्का बसला आहे. असाच काहीसा अनुभव मारिको बिस्कीट कंपनीचे मालक किशोर मारिवाल यांना आला आहे. हा अनुभव त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे शेअर केला आहे.
किशोर मारिवाल यांनी म्हंटले कि, मी सुट्ट्यांसाठी फुकेटमध्ये आलो आहे. मी एका आठवड्यासाठी बुकिंग केले होते. मी त्याठिकाणी पोहचल्यावर ऑफिस स्टाफ प्रेमाने सर्व तयारी करत होते. याचदरम्यान एकाने मला विचारले कि, तुम्ही भारतातून आला आहात का? तुम्ही हिंदू आहात का? हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो. जेव्हा मी हो म्हणालो आणि हे प्रश्न का विचारत आहेत असे विचारले. तोपर्यंत त्यांनी आपली मालकाला यासंबंधी सूचित केले होते. थोड्याच वेळात त्याचा मालक त्याठिकाणी आला आणि दोघांनीही एकमेकांसबोत थाई भाषेत संवाद साधला.
त्यांच्या मालकाने अतिशय शांतपणे मला म्हंटले कि, होडी तर आहे. परंतु आमच्याकडे नाविक आता केवळ एकच व्यक्ती उपलब्ध आहे. आणि तो मुस्लिम आहे. तुम्हाला त्याच्यासोबत जाण्यास आवडेल का? तुम्हाला काही अडचण तर नाही ना?
मारिवाला म्हणाले कि, त्यांच्या या प्रश्नाने मला धक्का बसला. तुम्ही असे का विचारत आहेत असे त्यांनी हॉटेल मालकाला विचारले. तर त्यांनी म्हंटले कि, भारतीयांना मुसलमान आवडत नाही आणि त्यांना त्यांच्यासोबत राहणे आवडत नाही असे माझ्या वाचण्यात आले आहे. यावर मारिवाला यांनी हिंदू असे मुळीच नाहीत. त्यांना सर्व जण आवडतात, असे स्पष्टीकरण दिले. विदेशातील सामान्य जनमनात भारतीयांची काय प्रतिमा बनत आहे. मला लाज वाटत आहे, असेही त्यांनी शेवटी म्हंटले आहे.
दरम्यान, किशोर मारिवाल मारिको बिस्कीट कंपनीचे मालक आहेत. पॅराशूट तेल, हेयरएंड केअर, मेडिकेअर शॅम्पू, लिवॉन इत्यादी त्यांची उत्पादने आहेत.