अमेरिका-इराण तणावाचा मोठा फटका; शेअर बाजार कोसळला

मुंबई – इराणने अमेरिकेच्या लष्करी तळांवर काही क्षेपणास्त्रे डागली. यामुळे इराण आणि अमेरिकेमधील संबंध आणखी ताणले गेले असून याचा परिणाम कच्या तेलांच्या किंमतीवर झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे.

शेअर बाजारावर अमेरिका-इराणमधल्या संभाव्य युद्धाचे सावट आहे. यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स ३८० अंकांनी कोसळून ४०,५०० अंकांवर पोहोचला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८० अंकांनी कोसळून ११,९५० अंकांवर सुरु झाला.

कच्च्या तेलाच्या परिणामामुळे इतर विकसनशील बाजारपेठांपेक्षा भारतीय बाजारपेठा नकारात्मक प्रतिक्रिया दर्शवित आहेत. खर्चाच्या टक्केवारीच्या रूपात आपली क्रूड आयातीवरील अवलंबन सर्वाधिक असल्याने अर्थव्यवस्था आणि बाजारावरही त्याचा परिणाम जास्त आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिका-यांनी दिली.

दरम्यान, जगातील एकूण तेल उत्पादनापैकी निम्मे तेल उत्पादन पश्‍चिम आशियामध्ये होते. इराणकडून तेल आयात थांबवल्यामुळे आपण इराक आणि सौदी अरेबियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल आयात करतो. कासेम सिलेमनीला इराकच्या भूमिवर संपवण्यात आले आहे. उद्या युद्ध इराकच्या भूमिवर लढले गेल्यास भारताला केल्या जाणाऱ्या तेल आयातीवर निश्‍चित परिणाम होईल. त्याचा मोठा आर्थिक फटका भारताला बसू शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.