मुंबई – दिग्दर्शक केदार शिंदेंचा ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमा सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातील दोन गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.’बहरला हा मधुमास’ आणि ‘गाऊ नको किसना’ ह्या गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. आता या गाण्याची क्रेझ सातासमुद्रापार पोहचली आहे. ‘गाऊ नको किसना’ या गाण्यावर एक मुलगी अमेरिकेतील रस्त्यावर नाचातानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत दिसणाऱ्या मुलीचे नाव कृतिका नारकर असे आहे. तिने न्यू यॉर्क येथील टाइम्स स्क्वेवर येथे ‘गाऊ नको किसना’ गाण्यावर अप्रतिम डान्स केला आहे. केदार शिंदेंनी देखील हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते आहे. नेटकरी देखील या गाण्यावर रील बनवत असल्याचे दिसते. यावरूनच या गाण्याची लोकप्रियता दिसून येते.
View this post on Instagram
दरम्यान, ‘गाऊ नको किसना’ हे गाणं यु ट्यूबवर रिलीज होताच लोकांच्या पसंतीस पडले होते. हे गाणं जयेश खरेने गायले आहे. यापूर्वी ‘चंद्रा’ हे गाणं गायलेल्या मुलाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. या मुलाचे सर्वत्र कौतुकही झाले होते. त्यानंतर संगीतकार अजय-अतुल यांनी या मुलाची भेट घेत त्याला गाण्याची संधी दिली. तो मुलगा म्हणजेच जयेश खरे.
केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमात अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अंकुशसह अमित डोलावत, सना, केदार शिंदे, अतुल काळे आदी कलाकार देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 28 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.