पिरंगुट -मुळशी तालुक्यात आज नव्याने 14 रुग्ण आढळून आले. तालुक्यातील करोना बाधितांची संख्या 263 झाली आहे. तर आज तालुक्यातील सहावा मृत्यू झाला. करोना ग्रस्तांची वाढती संख्या चिंताजनक आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजित कारंजकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आज माणमध्ये पाच, कासारआंबोलीमध्ये एक, पिरंगुटमध्ये एक, नेरेमध्ये तीन, हिंजवडीमध्ये तीन आणि सूसमध्ये एक रुग्ण सापडला आहे. तालुक्यात आतापर्यंत 79 रुग्ण उपचार घेऊन घरी परतले असून एकूण 170 रुग्ण उपचार घेत आहे. आज दोन रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.