कमल हासनयांच्या इंडियन चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच

जवळपास 22 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला दिग्दर्शक शंकर आणि कमल हसन यांच्या “इंडियन’ या चित्रपटाचा लवकरच सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेते कमल हासन यांची यामध्ये मुख्य भूमिका आहे. “इंडियन 2′ या चित्रपटाचे सध्या चित्रीकरण सुरू असून या चित्रपटातील काही भागांचे चित्रीकरण आंध्र प्रदेशमधील राजमुद्रा मध्यवर्ती कारागृहात होणार आहे. त्यानिमित्ताने काही दिवसापूर्वी कमल हासन यांनी या कारागृहाला भेट दिली.

“इंडियन 2′ हा कमल हसन यांच्या करिअरमधला अखेरचा चित्रपट ठरणार आहे. कारण या चित्रपटानंतर अभिनय कायमचा सोडणार असल्याच खुद्द कमल हासन यांनीच स्पष्ट केल होत. त्यामुळे या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटामधील काही भागांमध्ये तुरुंगातील सीन दाखविण्यात येणार आहेत. त्यामुळे फिल्ममेकर्सने शुटसाठी आंध्र प्रदेशमधील राजमुद्रा मध्यवर्ती कारागृहाची निवड केली होती. या कारणास्तव कमल हासन आणि त्यांची टीम या कारागृहात पोहोचली असून पुढील काही दिवस या कारागृहात चित्रपटाच चित्रीकरण करण्यात येणार आहे.

चित्रपटाची टीम कारागृहात पोहोचल्यानंतर येथील पोलीस आणि अन्य कर्मचाऱ्यांना कमल हासन यांच्या भोवती घोळका करत त्यांची भेट घेतली. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)