“शुभमंगल ज्यादा सावधान’मध्ये आयुष्मान चक्क समलैंगिक

“शुभ मंगल ज्यादा सावधान’ या आगामी सिनेमात प्रेम आणि संस्कार अशा विचित्र अवस्थेमध्ये अडकलेला आयुष्मान खुराना आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण या सिनेमात तो प्रथमच एका समलैंगिक युवकाचा रोल करतो आहे. फॅन्सना आपला रोल समजावून सांगण्यासाठी ट्‌विटरवर एक कॉमिक ऍनिमेटेड व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. त्यामध्ये या सिनेमातील त्रिपाठी कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांशी कोबीच्या आधारे हॅन्डबॉल खेळताना दिसत आहे. एकमेकांकडे कोबी फेकून “गोल’ करण्याचा प्रयत्न करतात.

जितेंद्र कुमारचे लक्ष मात्र आयुष्मान खुरानावरच खिळलेले असते. त्यामुळे खेळता खेळता त्याच्याकडे फेकला गेलेला कोबी तो झेलू शकत नाही. पण हा गोबी जितेंद्र कुमार झेलतो. पुढे हे दोघेजण एकमेकांकडेच कोबी पास करत खेळत राहतात आणि इतर सर्वजण त्यांच्याकडेच बघत बसतात, असे या व्हिडीओमध्ये दाखवले आहे.

या सिनेमात आयुष्मान आणि जितेंद्र कुमार व्यतिरिक्‍त गजराव राव, नीना गुप्ता, मानुर्षी चढ्ढा, सुनिता राजवर, मानवी गागरू आणि नीरज सिंह हे देखील असणार आहेत. या सिनेमाचे शुटिंग सुरू झाले असून पुढील वर्षी मार्चमध्ये तो रिलीज होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)