मुंबई – बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमीषा पटेलचा ‘गदर’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. शिख समाजाचा ‘तारसिंग’ आणि इस्लाम धर्मीय ‘सकिना’ यांच्या प्रेमाची कथा तूफान गाजली. 2001 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाची आजही मोठी क्रेझ आहे. या चित्रपटाच्या यशानंतर ‘गदर 2’ ची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र त्याआधी सनी देओलने एक माहिती सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे.
सनी देओलने गदर चित्रपट पुन्हा रिलीज होणार असल्याची माहिती सोशल मीडियावर चाहत्यांना दिली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले की, ‘तेच प्रेम, तीच कथा, पण यावेळी भावना वेगळी असेल. गदर पुन्हा रिलीज होत आहे. 9 जूनपासून काही दिवसांसाठी गदर चित्रपट रिलीज होणार आहे. तुम्हाला हा चित्रपट 4K आणि Dolby Atmos sound मध्ये पाहता येईल.’ गदर 2 रिलीज होण्याआधी ‘गदर’ सिनेमा रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
View this post on Instagram
सनीने गदर या चित्रपटाचा ट्रेलर देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. ’22 वर्षांनंतर तारा सिंह आणि सकिना यांची प्रेमकहाणी पुन्हा एकदा तुमच्या हृदयात स्थान निर्माण करण्यासाठी आली आहे,’ असे कॅप्शन त्याने या ट्रेलरला दिले आहे.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी सनी देओलने गदर-2 चित्रपटाचे पोस्टर शेअर करत ‘हिंदुस्तान जिंदाबाद है, जिंदाबाद था और जिंदाबाद रहेगा! आम्ही तुमच्यासाठी दोन दशकांनंतर भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा सिक्वेल घेऊन येत आहोत. 11 ऑगस्ट 2023 रोजी गदर-2 रिलीज होणार आहे,’ असे कॅप्शन दिले होते.
दरम्यान, ‘गदर 2′ चे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या चित्रपटात त्यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा देखील दिसणार आहे, जो ‘गदर: एक प्रेम कथा’ मध्ये बालकलाकार होता. मात्र ‘गदर 2’ मध्ये तो आता नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.