मुंबई – आयपीओसाठी नोंदणी वाढत असली तरी नोंदणीनंतर विक्री वाढत असल्यामुळे आयपीओच्या शेअरचे भाव नोंदणीवेळी घसरत असल्याचे दिसून येत आहे.
ऍपटस् व्ह्यल्यू हाउसींग फायनान्स कंपनीच्या आयपीओमधील शेअर नोंदणीच्या दिवशीच 6.52 टक्क्यानी कमी झाले. या कंपनीच्या शेअरचा भाव 329 रुपयावर बंद झाला.
असाच प्रकार केमप्लास्ट कंपनीबाबत झाला. आज या कंपनीच्या आयपीओ नोंदणीवेळी शेअरचा भाव 3 टक्क्यानी कमी होऊन 525 रुपये झाला.