जिओमध्ये आणखी एका अमेरिकन कंपनीची मोठी गुंतवणूक

इक्विटी कंपनी केकेआरचा ११ हजार ३६७ कोटी रूपयांच्या गुंतवणूकीचा निर्णय

मुंबई : करोनाने जगाला एकीकडे वेठीस धरले आहे. तर दुसरीकडे करोनामुळे चीनमधून अनेक मोठ्या कंपन्या बाहेर पडताना दिसत आहेत. त्याचा फायदा आता जगातील इतर देशांसह भारतालाही होताना दिसत आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ या कंपनीत अमेरिकेतील खासगी इक्विटी कंपनी केकेआरने ११ हजार ३६७ कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओने या गुंतवणुकीबद्दल माहिती दिली. केकेआर ११ हजार ३६५ कोटी रूपयांची गुंतवणूक करून जिओमधील २.३२ टक्के हिस्सा खरेदी करणार आहे.

कोणत्याही आशियाई कंपनीत केकेआरनं केलेली ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. जिओ प्लॅटफॉर्मची इक्विटी व्हॅल्यू ४.९१ लाख कोटी रूपये तर एन्टरप्राईझ व्हॅल्यू ५.१६ लाख कोटी रूपयांवर पोहोचली आहे. या गुंतवणुकीसोबतच रिलायन्स जिओमध्ये महिनाभराच्या कालावधीत ७८ हजार ५६२ कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. रिलायन्स जिओमध्ये महिन्याभरात करण्यात आलेली ही पाचवी गुंतवणूक आहे.

यापूर्वी रिलायन्स जिओमध्ये न्यूयॉर्कमधील खासगी इक्विटी कंपनी जनरल अटलांटिकनं ६,५९८.३८ कोटी रूपयांची गुंतवणूक केल्याची घोषणा करण्यात आली होती. याअंतर्गत जनरल अटलांटिक जिओ प्लॅटफॉर्ममधील १.३४ टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. आशियाई कंपनीतील जनरल अटलांटिकची ही सर्वात मोठी गुंतवणूक असल्याचे सांगण्यात आले होते.

सर्वप्रथम फेसबुकनं रिलायन्स जिओमध्ये फेसबुकनं ४३ हजार ५७४ कोटी रूपयांची गुंतवणूक करत ९.९९ टक्के हिस्सा खरेदी करणार असल्याची घोषणा केली होती. फेसबुकच्या गुंतवणुकीनंतर टेक इन्व्हेस्टर कंपनी सिल्व्हरलेकनं ५,६६५.७५ कोटी रूपयांच्या गुंतवणुकीसह जिओमधील १.१५ टक्के हिस्सा खरेदी करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर विस्टा इक्विटी पार्टनर्सनं जिओमधील २.३२ टक्के हिस्सा खरेदी केला होता. याअंतर्गत त्यांनी कंपनीत ११,३६७ कोटी रूपयांची गुंतवणूक केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.