दुष्काळाने होरपळत असलेल्या गावकऱ्यांनी फटाके फोडून केले पावसाचे स्वागत

दमदार पावसाने शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणीत

उस्मानाबाद : मागच्या वर्षी पडलेल्या भीषण दुष्काळानंतर यावर्षी पाऊस गायब झाल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील दहिफळ परिसरातील शेतकरी हवालदिल झाला होता. जुलै महिन्याचा उत्तररार्ध सुरू झाला तरी नांगरट मोडलेली नसल्याने यावेळी तरी पेरणी होणार की नाही याची चिंता शेतकऱ्यांना सतावत होती.

अखेर आज (१९ जुलै) शुक्रवारी दुपारी परिसरात दमदार पावसाचे आगमन झाले. या पावसामुळे गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आता पेरणी करता येणार म्हणून गावकऱ्यांनी चक्क पावसाचे फटाके फोडून स्वागत केल्याचे अनोखे चित्र आज याठिकाणी दिसून पाहायला मिळाले.

Leave A Reply

Your email address will not be published.