वाघोली (प्रतिनिधी) : पिंपरी सांडस ( ता.हवेली) येथील नलघे मळा झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. पिंपरी सांडस येथे वीज वितरण महामंडळाची उच्च दाब वाहिनी वादळ वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे कोसळली, काही खांब ही वाकडे झाले होते सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही .याबाबत रात्रीत कार्यवाही करत सकाळपर्यंत सर्व तारा व खांब व्यवस्थित करण्यात येऊन रात्रीत काम केल्याने वीजवितरण महामंडळाच्या व प्रदीप वसंतराव कंद यांच्या कार्यतत्परतेमुळे नलघे मळा येथील विजेचा प्रश्न सुटला असून नागरिकांनी कंद व महावितरणच्या सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
“शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व ग्रामस्थांच्या मदतीने महावितरण कडून नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या जास्तीत जास्त वीजेबाबतच्या
समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत.
– प्रदीप वसंतराव कंद (सदस्य, पुणे जिल्हा विद्युत वितरण कंपनी)
प्रदीप कंद यांना पिंपरी सांडस येथील डी पि च्या फ्यूज व इतर समस्यांबाबत विजय भोरडे यांनी मागणी केली होती त्यानुसार तातडीने दुरुस्ती करण्यात आली आहे. पिंपरी सांडस येथील नागरिकांनी याबाबत पुणे जिल्हा शासकीय विद्युत समिती सदस्य प्रदीप वसंतराव कंद यांच्यासह महापारेशन, विद्युत वितरण महामंडळाच्या मोरे व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय भोरडे, रघुनाथ हरपळे, भगवान भोरडे, भाऊसाहेब भोरडे,तानाजी हरपळे, माऊली भोरडे, सूरज नलगे, विजय भोरडे, माऊली हरपळे ,वायरमन दिपक भोरडे उपस्थित होते.