नवी दिल्ली – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून (दि.22 ते 24 ऑगस्ट 2023 दरम्यान) तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत. तीन दिवासांच्या दौऱ्यात मुर्मू राज्यातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावतील.
22 ऑगस्ट 2023 रोजी, राष्ट्रपती, गोवा येथील राजभवन येथे त्यांच्या सन्मानार्थ गोवा सरकारने आयोजित केलेल्या नागरी सत्काराला उपस्थित राहतील. या प्रसंगी त्या निवडक लाभार्थ्यांना वनहक्क कायद्यांतर्गत ‘सनद’ वाटपही करणार आहेत.
23 ऑगस्ट 2023 रोजी, राष्ट्रपती गोवा विद्यापीठाच्या 34 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील आणि गोवा राजभवन येथे गोव्यातील आदिवासी समूहाच्या सदस्यांशी संवाद साधतील. त्याच दिवशी त्या पर्वरी येथील गोवा विधानसभेला संबोधित करणार आहेत.
24 ऑगस्ट 2023 रोजी, गुरूवारी मुर्मू उत्तर गोव्यातील 17व्या शतकातील पोर्तुगीज काळातील आग्वाद किल्ल्याला भेट देतील. जुन्या गोव्यातील बॅसिलिका ऑफ बॉम जिझसलाही भेट देणार आहेत.
दिल्लीला परतण्यापूर्वी त्या फोंडा येथील प्रसिद्ध शांतादुर्गा मंदिरालाही भेट देतील, अशी माहिती राष्ट्रपती कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे.