सोन्यावरील आयात शुल्क कमी होण्याची शक्‍यता

नवी दिल्ली – दागिने निर्यातदारांनी सोन्यावरील आयात शुल्क कमी करण्याचा आग्रह केला आहे. त्यानुसार सोन्यावरील आयात शुल्क कमी होण्याची शक्‍यता व्यक्त केली जाऊ लागली आहे.

संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना या संबंधात काही निवेदन आले आहे का असे विचारले असता त्या म्हणाल्या की दागिने उत्पादकांडून आयात शुल्क कमी करण्याची मागणी केलेले निवेदन प्राप्त झाले आहे. सध्या सोन्यावर तब्बल 10 टक्‍के आयात शुल्क लागू आहे. यामुळे भारताची चालू खात्यावरील तूट कमी होण्यास मदत होते. यामुळे सरलेल्या वर्षात सोन्याची आयात 3 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 32.8 अब्ज डॉलरची झाली आहे. सोन्याच्या दागिन्यांची निर्यात 5.32 टक्‍यांनी कमी होऊन 30.96 अब्ज डॉलर झाली आहे. त्यांच्या मागण्याचा सर्वसमावेशक विचार करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.