#Video : बुडत्या कुत्र्यांचा जीव वाचविणाऱ्या मुंबई पोलिसांवर होतोय कौतुकाचा वर्षाव

पुणे – गेले ५ दिवस मुंबईसह उपनगरांना पावसाने अक्षरशः झोडपले. मुंबई, उपनगरे आणि पालघर, वसई विरारला पावसाने रेकॉर्ड ब्रेक झोडपले. 1974, 2005 नंतर इतका तुफान पाऊस झाला. सोमवार आणि मंगळवारी तर पावसाने हाहा:कार माजवला. त्यामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले. अनेकांचे बळी गेले.

अनेक वसाहतीत पाणी शिरले. अनेक रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. मुंबईच्या पावसाचा केवळ माणसांनाच नाहीतर मुक्या जनावरांना सुध्दा फटका बसला.

मुंबईतील रस्त्यावर पाणी साचल्याने एक लहानसं कुत्र्याचं पिल्लू देखील पाण्यात अडकलं होतं आणि जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करत होतं. हे दृश्य मुंबई पोलिसांतील प्रकाश पवार यांना दिसताच त्यांनी त्या लहानशा कुत्र्याच्या पिल्लाला पाण्यातून बाहेर काढत त्याचे प्राण वाचविले. नेमका हाच व्हिडीओ सोशल मिडियावर सध्या व्हायरल होत असून अनेकांनी मुंबई पोलिसाचं कौतुक केलं आहे.

दरम्यान मुंबई पोलिसांनी देखील प्रकाश पवार याचं कौतुक करत हा व्हिडीओ मुंबई पोलिसाच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.