नवी दिल्ली – अतिशय शक्तीशाली सौर वादळ पृथ्वीवर धडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे वादळ तब्बल 1.6 दशलक्ष किलोमीटर वेगाने घोंघावते आहे आणि रविवारी किंवा सोमवारी ते पृथ्वीवर थडकण्याची शक्यता आहे.
सूर्याच्या वातावरणातून या वादळाची निर्मिती झाली आहे, असे स्पेसवेदर डॉट कॉम या हवामान वि,यक वेबसाईटने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे. या सौर वादळामुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर महत्त्वपूर्ण परिणाम होईल, असाही अंदाज या वृत्तामध्ये वर्तवण्यात आला आहे.
हे सौर वादळ आज दिवसभरामध्ये पृथ्वीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पृथ्वीवरील चुंबकीय क्षेत्रावरही परिणाम होऊ शकतो. सूर्याच्या वातावरणातून विषवृत्तावरील भोकातून हे वादळ किमान सेकंदाला 500 किलोमीचर इतक्या प्रचंड वेगाने होऊ शकते.
मात्र यामुळे पूर्ण भूचुंबकीय वादळ निर्माण होण्याची शक्यता नाही. मात्र उच्च अक्षांशांवर कमी क्षमतेचे चुंबकीय सौर वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे, असे या वेबसाईटवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.