पुणे – दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा एका गुंडाचा कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आला आहे. रविवारी भरदिवसा ही घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली होती.
अक्षय किर्वे (वय 36) असे खून झालेल्या गुन्हेगारीचे नाव आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्याच्यावर पोलिसांनी तडीपरीची कारवाई केली होती. त्याच्यावर 6 गुन्हे दाखल आहेत. नुकतीच त्याची तडीपरी संपली होती.
या दरम्यान आज 7 वाजण्याच्या सुमारास त्याच्यावर चौघांनी भररस्त्यात कोयत्याने आणि तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करून त्याचा खून केला. त्यानंतर हे चौघे तेथुन पसार झाले आहे. यादरम्यान ही माहिती मिळाल्यानंतर दत्तवाडी पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
हा खून दत्तवाडीतील वर्चस्वाच्या वादातून त्याचा भररस्त्यात खून झाला असल्याची चर्चा होत आहे. अद्यापही खूनाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.