जोहान्सबर्ग : क्रिकेटविश्वात ‘मिस्टर ३६०’ अशी ओळख असलेला दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज एबी डिव्हिलयर्स पुढील वर्षी होणा-या टी-२० विश्वचषक स्पर्धेआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे, असे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसिस याने म्हटले आहे.
दरम्यान, अव्वल खेळाडूंच्या निवृत्तीनंतर आफ्रिकेचा संघ सध्या खराब फाॅर्मातून जात आहे. या संघाला आगामी टी-२० क्रिकेट विश्वचषकामध्ये संजिवनी देण्याचे काम आक्रमक फलंदाज एबी डिव्हिलियर्स करणार आहे. डिव्हिलियर्स याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, पण संघाच्या मदतीसाठी त्याला निवृत्ती मागे घेण्याची गळ घातली जात आहे, अशी माहिती फाफ डुप्लेसिसने दिली आहे.
Faf du Plessis comments come after newly appointed South Africa head coach Mark Boucher said he would be open to having a conversation with AB de Villiers on a possible return ahead of the T20 World Cup next year. pic.twitter.com/3n6APmDoZ9
— Doordarshan Sports (@ddsportschannel) December 17, 2019
डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारात एकूण ४२० सामने खेळताना २० हजाराहून जास्त धावा केल्या. यामध्ये ४७ शतकांचा समावेश आहे. डिव्हिलियर्सने २२८ वनडेंत ५३.५०च्या सरासरीने ९५७७ धावा केल्या आहेत. ज्यात २५ शतके आणि ५३ अर्धशतकांचा समावेश आहे.
याबाबत एबी डिव्हिलियर्सने अद्याप काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही, पण क्रिकेटविश्वाला त्याच्या पुनरागमनाचे वेध लागले आहेत.