जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक्स कॅलिस याची दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाच्या फलंदाजी सल्लागारपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड पूर्ण हंगामासाठी करण्यात आली आहे, अशी माहिती द.आफ्रिका क्रिकेट मंडळाने ट्विटरव्दारे दिली आहे.
#BreakingNews Former Standard Bank Proteas all-rounder, @jacqueskallis75 has been named as the team’s batting consultant for the duration of the summer. He will join the squad for their camp starting in Pretoria today (Wednesday). #Thread#ProteaFire pic.twitter.com/aHOnlovt1c
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 18, 2019
विश्वचषकातील सुमार कामगिरीनंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाची पुर्नबांधणी करण्यासाठी ही पावले उचलण्यात येत अाहेत. त्या दृष्टीने ही निवड करण्यात आली असल्याचे आफ्रिका मंडळाने म्हटले आहे.
Kallis boasts a combined 519 international matches for South Africa with 25 534 runs and 577 wickets. He retired from all forms of international cricket in 2014 after amassing 62 international centuries – 45 Test and 17 ODI – averaging 55.37 and 44.36 in each format respectively. pic.twitter.com/v1uG8vf22R
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 18, 2019
साल २०१४ मध्ये जॅक कॅलिसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. कसोटी क्रिकेटमध्ये कॅलिसने १६६ सामन्यांमध्ये ५५.३७ च्या सरासरीने १३,२८९ धावांसह ४५ शतके आणि ५८ अर्धशतके झळकावली आहेत. या १६६ कसोटी सामन्यांमध्ये त्याने पाच वेळा डावात पाच विकेट्स घेण्याची किमया करत २९२ बळी मिळवले असून २०० झेलही टिपले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये कॅलिसने ३२८ सामन्यांमध्ये ११,५७९ धावांसह १७ शतके आणि ८६ अर्धशतके असून २७३ बळी त्याच्या नावावर आहेत.
ICYMI || CRICKET SOUTH AFRICA today announced the appointment of Mark Boucher as head coach of the @StandardBankZA Proteas and Enoch Nkwe as assistant coach at a well-attended Media Briefing at Newlands
Read more – https://t.co/IANUkmbVW5 pic.twitter.com/ZGLia1jLwQ
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 14, 2019
दरम्यान, काही दिवसापूर्वीच माजी कसोटीपटू आणि यष्टीरक्षक मार्क बाउचर याची आफ्रिका क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी २०२३ पर्यंत निवड करण्यात आली होती.