नेवाशात भाजपाला लागली ओहटी भाजपचे जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे यांनी स्विकारले आमदार गडाखांचे नेतृत्व
नेवासा (प्रतिनिधी) – भाजपचे जिल्हा परिषद सदस्य व कायम निमंत्रित सदस्य म्हणून परिचित असलेले दत्तात्रय काळे यांनी भाजापाच्या सर्व पदांचा त्याग करत भेंडा येथे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या गटात जाहीर प्रवेश केला आहे नेवासा तालुका भाजपात नियुक्त्यावरून कुरघोड्या सुरू असतानांच काळे यांनी गडाख गटात प्रवेश केल्याने माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे – पाटील यांना राजकिय दृष्ट्या हा मोठा राजकिय धक्का मानला जात आहे त्यामुळे विरोधक सध्या राजकिय अडचणीत सापडलेले असून आ.गडाख यांच्यासाठी आगामी राजकारणाला मोठे बळ मिळत असल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे भेंडा बुद्रूकचे उपसरपंच पंढरीनाथ फुलारी,देवगावचे सरपंच विष्णू गायकवाड,देवगांवचे ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र काळे, रवींद्र गायकवाड,भाऊसाहेब गायकवाड,महेश गायकवाड,गणेश गायकवाड,सरपंच सोपानराव लोखंडे रांजणगांव देवी,तुकाराम दामोदर कोलते यांनी प्रवेश केला आहे.
नेवासा तालुक्यात भाजपाला लागलेली ओहटी ही राजकिय गोटात आश्चर्याचा विषय ठरत आहे खुपटी, शिंगवे,नेवासा बुद्रुक,भानासहिवरे,शनिशिंगणापूर, कुकाण्यासह अनेक निष्ठावान भाजपचे पदाधिकारी आ. गडाख गटात सामिल झालेले आहेत.एकाच वेळी भेंडा गटाचे जिल्हा परिषद सदस्य,देवगावचे सरपंच व शहापुरचे सरपंच यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत गडाख गटात प्रवेश केल्याने तालुक्यातील भाजपात स्थानिक नेतृत्वाविरोधात तीव्र नाराजी दिसून येत आहे.
जिल्हा परिषद सदस्य काळे यांचा भेंडा कुकाणा,चांदा गटात मोठा लोकसंपर्क आहे माजी आमदार मुरकुटे यांच्या गटातून ते जिल्हा परिषद सदस्य म्हनून निवडून आले होते.२०१४ व २०१९ च्या विधानसभेला काळे यांनी मोठी भूमिका बजावली होती.काळे यांच्या प्रवेशाने आ.गडाख यांची राजकीय परिस्थिती अधिक सुदृढ बनली आहे केंद्र व राज्यात सत्ता असलेल्या भाजपा नेवासा तालुक्यात मात्र खिळखिळी झाल्याचे दिसून येत असून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांचे नेतृत्व झुगारून भाजपाचे कार्यकर्ते आता आमदार गडाख यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करत आहेत.
गडाख जोमात विरोधक कोमात
आमदार शंकरराव गडाख सध्या तालुका पिंजून काढत आहे.जनतेच्या भेटीगाठी घेत आहे त्यांच्या प्रयत्नातून शासकिय निधीतून विविध गावात सभा मंडप उभारले जात आहे विधानसभेची आ.गडाखानी आतापासूनच तयारी चालू केली आहे याउलट माजी आ.मुरकुटे यांच्या राजकारणाला उतरती कळा लागलेली दिसत आहे.
मुरकुटे यांच्यासाठी जीवाचे रान केलेले कार्यकर्ते मुरकुटे यांना सोडचिठ्ठी देत असून विधानसभेच्या पार्श्वभूमीवर गडाख यांना अनुकूल परिस्थिती असली तरीही आमदार गडाख यांनी थेट जनसंपर्क मोहीम हाती घेतल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.