नवी दिल्ली – करोनाचा नायनाट करणारी लस शोधण्यासाठी अनेक शास्त्रज्ञ काम करत आहेत. अजुन कोणाला यश मिळाले नसले तरी युध्दपातळीवर सगळ्यांचेच प्रयत्न सुरू आहेत. या वर्षाच्या अखेरपर्यंत जरी लस शोधली गेली इतक्या कमी कालावधीत विकसित करून बाजारात दाखल झालेली ही पहिलीच लस असणार आहे.
सध्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ऍस्ट्रेजेनेका यांच्याकडून तयार केली जाणारी लस अगदी अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आशेचा किरण दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी आदर पूनावाला यांनी माहिती सांगितली आहे.
काय म्हणाले आदर पूनावाला
आरोग्य कर्मचारी आणि वृद्ध व्यक्तींसाठी ऑक्सफर्ड लस येत्या वर्षातील एप्रिल 2021 ला बाजारात दाखल होईल. ते पुढे म्हणाले सामान्य लोकांसाठी, लसीच्या दोन आवश्यक डोसांची किंमत 1000 रुपयांपर्यंत असू शकते. मात्र हे शेवटच्या चाचणीच्या निकालावर आणि नियामक संस्थांकडून मंजुरीवर अवलंबून असेल.