आरोग्य मंत्र्यांनी स्वतः घेतला करोना लसीचा डोस

भारतातील 'कोवॅक्सिन'च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात

मुंबई – देशभरात करोनाचा आलेख घसरत असतानाच बहुतांश राज्यात पुन्हा रुग्ण वाढीस सुरुवात झाली आहे. जगभरातील औषध कंपन्या करोना विरोधात लस शोधत आहेत. अशातच भारतातील ‘भारत बायोटेक’ या फार्मा कंपनीने पहिली स्वदेशी ‘कोवॅक्सिन’ ही लस तयार केली आहे. या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली आहे. या चाचणीत हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज हे स्वतः सहभागी झाले आहेत.

कोवॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या रोहतक, हैद्राबाद आणि गोवा येथे सुरु झाल्या असून अनिल विज यांनी स्वयंसेवक म्हणून सहभागी झाले आहेत. अंबाला येथील रुग्णालयात आज अनिल विज यांना कोवॅक्सिनचा पहिला डोस देण्यात आला.

तिसऱ्या टप्प्यात २०० स्वयंसेवकांना पहिला डोस दिला आहे. तर २८ दिवसानंतर दुसरा डोस दिला जाणार आहे. यानंतर ४८ दिवसांनी किती प्रमाणात अँटीबॉडिज तयार झाल्या याची चाचणी केली जाणार आहे. याच्या परिणामानंतर देशभरात निश्चित केलेल्या २१ विभागात २५ हजार ८०० स्वयंसेवकांना लस दिली जाणार आहे.

पीआयजीचे कुलपती डॉ. ओ.पी. कालग म्हणाले, या लसीचा धोका कमी आहे. आतापर्यंत जितक्या लोकांना चाचणी म्हणून लस दिली गेली, त्यातील दोघांना थोडा ताप व लस दिली तेथे थोड्या वेदना झाल्या आहेत. पण करोना झालेला नाही. फेब्रुवारी नंतर ही लस बाजारात येईल असे सांगितले जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.