युरोपातील प्रादुर्भाव वाढल्याने चिंता वाढली

गरीब देशही करोनाच्या विळख्यात

अमेरिकेबरोबर, स्पेन, इटलीशिवाय दक्षिण आफ्रिकेतही स्थिती बिघडली 

मद्रिद – इटली आणि स्पेस्न या दोन करोनाग्रस्त देशांमध्ये मृतांचा आकडा एकाच दिवसात अचानक वाढला. या दोन्ही देशांमध्ये एकाच दिवसात 800 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे जगभरात या रोगामुळे मरण पावलेल्यांची संख्या 20 हजाराच्यावर पोहोचली आहे. अमेरिकेतही करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. मात्र तरिही अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यूयॉर्क शहर संपूर्ण बंद करण्याच्या कठोर उपाय योजनेच्या निर्णयाला अद्याप संमती दिलेली नाही. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी एकतृतीयांश नागरिकांना सध्या करोनाच्या संसर्गाच्या भीतीमुळे लॉकडाऊनखाली आहे. त्यामुळे लक्षावधी रोजगार बंद अवस्थेत आहेत. तर आरोग्य सेवांवर प्रचंड ताण आलेला आहे. अतिरिक्‍त खर्चामुळे या सर्वांचा भविष्यकाळातील परिणाम देशांच्या महसूलावर होतो आहे.

जागतिक पातळीवर मृतांची संख्या 30,000 वर गेली आहे. तर परिस्थिती आणखीन बिघडू शकते असे अनेक देशांच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटल्‌ आहे. सर्वात पहिल्यांदा करोनाचा प्रादुर्भाव जाणवलेल्या वुहानमध्ये अधिकाऱ्यांनी स्थिती सुधारत असल्याचे चित्र उभे केले जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली तेथील परिवहन व्यवस्था पूर्ववत होत आहे.

अमेइरिकेत न्यूयॉर्क आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय अध्यक्ष ट्रम्प यांनी शनिवार संध्याकाळी नाकारला. तसे केल्यास स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण होईल, अशी भीती स्थानिक नेत्यांनी व्यक्‍त केली होती. त्यामुळे ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला नाही. तथापि, रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने, रहिवाशांना आवश्‍यक कारणांशिवाय प्रवास न करण्यास सांगितले आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या एका सर्वेक्षणानुसार आता जगभरात अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे 1 लाख 24 हजार जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे.

अमेरिकेनंतर युरोपातील देशांना करोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. युरोपातील एकूण मृत्यूच्या निम्मे मृत्यू एकट्या इटलीमध्ये झाले आहेत. स्पेनमध्ये शनिवारी एका दिवसात 832 जणांचा मृत्यू झाला. तेथील मृत्यूचा आकडा आता 6 हजाराच्या जवळ पोहोचला आहे. रशियामध्ये अजून करोनाच्या प्रादुर्भावाची स्थिती विशेष गंभीर नाही. पण तरिही रशियाने सोमवारी शेजारी देशांबरोबरच्या सीमा बंद करायचे ठरवले आहे.
अनेक देशांमध्ये करोनाच्या चाचण्या होण्याचे प्रमाणच कमी आणि रिपोर्ट मिळण्यास विलंब होत असल्याने करोनाबाधितांची संख्या अधिक असण्याची शक्‍यता आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत 2 हजार जणांचे मृत्यू झाले आहेत. एप्रिलच्या पहिल्या पंधरादिवसातील स्थिती अधिक बिकट असेल, असे पंतप्रधान एडवर्ड फिलिप यांनी म्हटले आहे.

ब्रिटनमध्ये आतापर्यंत 1 हजार मृत्यू झाले. तर बेल्जियम आणि इराणमध्ये अचानक मृत्यूची आकडेवारी वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेत लोकांनी गर्दी करू नये म्हणून सुपर मार्केटमध्ये गर्दी करणाऱ्या ग्राहकांवर पोलिसांना रबरी गोळ्या झाडाव्या लागल्या. अलिकडच्या आठवड्यांत लॉकडाउनमुळे पॅरिस, रोम आणि माद्रिदचे रस्ते रिकामे होते. त्यामुळे युरोपातल्या श्रीमंत देशांबरोबर विकसनशील देशांनाही या रोगाच्या विळख्यात खेचले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.