बिजींग – चीन मध्ये काल दिवसभरात करोना रोगामुळे आणखी 52 जण दगावल्यामुळे या रोगामुळे बळी गेलेल्यांची संख्या आता 2715 झाली आहे. तसेच रूग्णांची संख्या आता 78 हजार 64 इतकी झाली आहे. रोगामुळे गंभीर असलेल्यांची संख्या आता 8752 इतकी झाली आहे. मात्र त्याचवेळी बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. आत्ता पर्यंत 29 हजार 745 रूग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
चीनमध्ये या रोगग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या तब्बल 6 लाख 47 हजार लोकांची आता सरकारला चिंता आहे. त्यामुळे त्यांच्यावर वैद्यकीयदृष्ट्या निरीक्षण ठेवावे लागत आहे. त्यातील 79 हजार लोकांना निरिक्षणाखाली घेण्यात आले आहे त्यामुळे चीनच्या वैद्यकीय यंत्रणेवरील ताण आणखीनच वाढला आहे. चीन सरकारच्या वैद्यकीय विभागाचे म्हणणे असे आहे की या रोगाचा प्रसार अगदी विकोपाला गेल्यानंतर तो हळूहळू कमी होऊ लागेल. पण हा प्रसार विकोपाला गेल्याची वेळ अजून आलेली नाही. म्हणजेच या विषाणुंच्या प्रचाराचे गांभीर्य अजूनही कायम आहे.