नवी दिल्ली – देशातील करोनाच्या साथीवर सध्या मोठे नियंत्रण येत असून, आज देशात गेल्या 54 दिवसांतील सर्वात नीचांकी रुग्ण पातळी नोंदवली गेली आहे.
गेल्या 24 तासांत देशात एकूण 1 लाख 27 हजार 510 नवीन करोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे देशातील एकूण करोना रुग्ण संख्या आता 2 कोटी 81 लाख 75 हजार 44 इतकी झाली आहे, तर गेल्या 24 तासांत करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या 2795 इतकी झाल्याने देशातील एकूण करोना बळींची संख्या आता 3 लाख 31 हजार 895 इतकी झाली आहे.
पॉझिटिव्हिटीचा रेट आता 6.62 इतका झाला असून, देशात सध्या करोनाचे सक्रिय बाधित 18 लाख 95 हजार 520 इतके झाले आहेत.