नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोने आणि चांदीचे दर वाढत असल्यामुळे भारतातही मंगळवारी सोने आणि चांदीच्या दरात भरीव वाढ झाली असल्याचे दिसून आले.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 285 रुपयांनी वाढून 48,892 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर तयार चांदीचा दर 952 रुपयांनी वाढून 71,850 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,912 डॉलर तर चांदीचा दर 28.32 डॉलर प्रती औंस या पातळीवर गेला.
याबाबत बोलताना मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे नवनीत दमाणी यांनी सांगितले की, जागतिक वायदे बाजारात सोन्याचे दर वाढत असल्यामुळे भारतातही सोने पाच महिन्याच्या उच्चांकी पातळीवर गेले आहे.