पॅरिस – जगभरामध्ये करोना रुग्णांची संख्या 1 कोटीपेक्षा जास्त होणारा फ्रान्स हा सहावा देश ठरला आहे. शनिवारी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत आकडेवारीमुसार ही माहिती पुढे आली आहे. फ्रान्समध्ये 24 तासात 2 लाख 19 हजार 126 नवीन करोना रुग्णांची नोंद झाली आहे.
फ्रान्समध्ये शुक्रवारी आतापर्यंत एका दिवसातील सर्वाधिक म्हणजे 2 लाख 32 हजार 200 रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर शनिवारची रुग्णसंख्या दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक संख्या ठरली आहे. सलग चार दिवसात फ्रान्समध्ये 2 लाखांपेक्षा अधिक करोना रुग्णांची नोंद झाली आहे. एक कोटींपेक्षा अधिक करोना रुग्णांची नोंद फ्रान्सपूर्वी अमेरिका, भारत, ब्राझिल, ब्रिटन आणि रशियामध्ये सापडले आहेत.
करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबेबत अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी नवून निर्बंदांबाबत कोणतेही सूतोवाच केलेले नाही. सरकारने कोणत्याही नवीन निर्बंदांना लागू करणे टाळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र 6 ते 11 वर्षांपर्यंतच्या मुलांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य असल्याचा मियम यापुढेही कायम असणार आहे. पॅरिस,आणि लेयॉन यासारख्या शहरांमध्ये मास्कबाबतचा नियम सर्वांसाठीही लागू असणार आहे.
फ्रान्समध्ये गेल्या 7 दिवसात एक दिवसातील रुग्णसंख्येची सरासरी 1 लाख 57 हजारांच्या पुढे गेली आहे. महिन्याबरात ही संख्या तब्बल 7 पटींनी वाढली आहे.