बारामती -राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच बारामती शहर आणि तालुक्यात एकच जल्लोष झाला. शहरातील राष्ट्रवादी भवन व फटाक्यांची आतषबाजी करीत कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला.
महाशिव आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे नेमकी कोणती जबाबदारी दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते अखेर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार यांना उप मुख्यमंत्रिपदी विराजमान केल्यानंतर बारामती बारामतीकरांनी आनंद व्यक्त केला.
शहरासह तालुक्यात फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार हे आधीच माहीत पडल्याने राष्ट्रवादीचे नेते उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, नगरसेवक सत्यव्रत काळे राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ, नगरसेवक अतुल बालगुडे, समीर चव्हाण, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सिद्धनाथ भोकरे, पंचायत समितीचे माजी सदस्य दीपक मलगुंडे, मुस्लीम बॅंकेचे संचालक अल्ताफ सय्यद तसेच पांडुरंग चौधर कार्यकर्त्यांनी मुंबईत हजेरी लावली. महाविकास आघाडीत अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची संधी मिळाल्याने राष्ट्रवादीच्या गोटात नवचैतन्य निर्माण झाले आहे.