नौदलाला मिळाले दहावे पी 81 लढाऊ विमान

नवी दिल्ली – भारतीय नौदलाला पाणबुडी विरोधी पी 81 जातीचे दहावे लढाऊ विमान आज अमेरिकेच्या बोईंग कंपनीकडून प्राप्त झाले आहे. बोईंग कंपनीशी ही विमाने पुरवण्याचा करार 2009 मध्ये झाला होता. सन 2016 मध्ये त्यात आणखी चार विमाने वाढवण्याचा निर्णय झाला आहे. नौदलाला नववे विमान नोव्हेंबर मध्ये मिळाले होते.

ही विमाने नौदलासाठी अत्यंत उपयुक्त साबित होत आहेत. या जातीची विमाने नौदलात 2013 रोजी प्रथम दाखल करण्यात आली आहेत. ती चालवण्यासाठी नौदलाच्या वैमानिकांना बोईंग कंपनीकडून विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे. 

विमानाशी संबंधीत सर्व तांत्रिक मदत बोईंग कडून उपलब्ध केली जात आहे. त्यात स्पेअरपार्टस, ग्राऊंड सपोर्ट सामग्री, आणि फिल्ड सर्व्हिस प्रतिनिधींची मदत याचाहीं समावेश आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.