कोल्हापूर – संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेला जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची आज निवड झाली. अध्यक्षपदी कॉंग्रेसचे राहुल पाटील यांची तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे जयवंत शिंपी यांची निवड झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या विशेष सभेत या निवडी पार पडल्या. विशेष म्हणजे महा विकास आघाडीच्या या दोन्ही उमेदवारांना भाजपनं पाठिंबा देत बिनविरोध निवड केली आहे. पीठासन अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी किशोर पोवार यांनी काम पाहिले.
अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राहुल पाटील यांनी अर्ज दाखल केला व उपाध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून जयवंत शिंपी या दोघांचेच अर्ज होते विशेष म्हणजे विरोधी भाजप आघाडीकडून अर्जच दाखल न करता जाहीर पाठिंबा देण्यात आला .
अध्यक्ष पदासाठी राहुल पाटील व उपाध्यक्ष पदासाठी जयवंत शिंपी या दोघांचेच अर्ज राहिल्याने त्यांच्या बिनविरोधीची घोषणा अप्पर जिल्हाधिकारी किशोर पोवार यांनी केले. निवडीनंतर त्यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण करत विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.