धारवाड, – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची तीन दिवसांची बैठक येत्या 28 ऑक्टोबर पासून धारवाडला होणार आहे. त्या बैठकीत बांगलादेशात हिंदुंवर झालेल्या हल्ल्यांच्या संबंधात आढावा घेतला जाणार असून त्या अनुषंगाने एक स्वतंत्र ठरावही त्यात संमत केला जाण्याची शक्यता आहे.
संघाचे पदाधिकारी सुनिल अंबकेर यांनी आज पत्रकारांना ही माहिती दिली. ते म्हणाले की देशाच्या ज्या भागात संघाचे अजून अस्तित्व नाही त्या भागात संघाचा प्रसार करण्याच्या संबंधातही कार्यक्रम ठरवला जाणार आहे.
संघाच्या अन्य उपक्रमांचा आढावा घेऊन त्याचा विस्तार करण्यावरही यावेळी चर्चा होईल असे ते म्हणाले. सन 2025 साली संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष पुर्ण होत आहेत.या पार्श्वभूमीवर संघाने चालू वर्षापासून पुढील तीन वर्षांसाठी संघाच्या विस्ताराचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यावरही या बैठकीत प्रामुख्याने चर्चा होणार आहे.