नवी दिल्ली – रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्रालयाने आज बालकांच्या सुरक्षेसाठीच्या नियमांचा मसुदा जारी केला. या प्रस्तावित नियमांनुसार जर मोटर सायकलवर 4 वर्षांपर्यंतचे बालक असेल तर या मोटर सायकलची वेगमर्यादा ताशी 40 किलोमीटर इतकी असायला हवी आहे.
याशिवाय 9 महिने ते 4 वर्षांपर्यंतचे बालक जर मोटरसायकलवर असेल तर त्या बालकालाही हेल्मेट घालणे अनिवार्य असणार आहे. याशिवाय या बालकाला चालकाबरोबर सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक सुरक्षेच्या उपाय योजनाही असाव्या लागणार आहेत.
या बालकाच्या डोक्यावर बसेल असे सायकल हेल्मेट असायला पाहिजे. त्या हेल्मेटचे पट्टे बालकाच्या शरीराला बांधले जायला हवेत.