पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरातील उन्हाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला असून, लवळे परिसरात हंगामातील उचांकी 41 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दुपारी 12 ते 2 दरम्यान चटका सोसेनासा होत आहे.
मागील चार दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील उन्हाचा पारा दोन ते तीन अंशाने वाढलेला आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पारा 40 च्या उंबरठ्यावर होता. मात्र, होळी झाली आणि दुसऱ्या दिवशी पारा 40 अंशाच्या पुढे गेला. सलग दुसऱ्या दिवशी पुण्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरातील कमाल व किमान तापमानात एका अंशाने वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
रात्रीचा उकाडा वाढला…
शहरासह जिल्ह्यात मागील आठ दिवसांपूर्वी शहरातील कमाल तापमान 35 ते 36 अंशावर असले तरी किमान तापमान 12 ते 15 च्या जवळपास होते. त्यामुले दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री गारवा अशी परिस्थिती होती. मागील, मागील दोन ते तीन दिवसात कमाल तापमानासह किमान तापमानातही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे रात्रीचा गारवा कमी होवून उकाडा वाढू लागला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात कमाल तापमान 38.9 तर किमान तापमान 18.6 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले आहे.
शहरातील आजचे कमाल तापमान
कोरेगाव पार्क –
लवळे 40.9
लोहगाव आणि मगरपट्टा 39.6
पाषाण – 39.2
शिवाजीनगर – 38.9