अहमदाबाद – आयपीएल 2023 चा 62 वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद असा रंगणार असून हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्त्वाचा असणार आहे.
अशातच हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स या सामन्यात लॅव्हेंडर जर्सी परिधान करणार आहे. या जर्सीचा मुख्य उद्देश लोकांना कॅन्सरबाबत जागरूक करणे असा असणार आहे.
गुजरात टायटन्सने हा सामना जिंकला तर त्यांचे प्ले ऑफ मधील स्थान पक्के होईल. तर सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये जाण्याच्या त्यांच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक आहे.
गुजरात टायटन्स –
रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ आणि नूर अहमद.
सनरायझर्स हैदराबाद –
अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंग, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), एडन मार्कराम (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, टी नटराजन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार आणि फझलक फारुकी.