उत्तर प्रदेशातील मेरठमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही तरुणांकडून मुस्लिम मुलींशी गैरवर्तन केले जात आहे. मुलींचे बुरखे काढण्यात आले, त्यांच्याशी गैरवर्तन करण्यात आले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे आणि लोक कारवाईची मागणी करत आहेत. मेरठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची दखल घेतली जात असून कारवाई करण्यात येत आहे.
बाजारात गैरवर्तन –
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मुस्लिम तरुणी मेरठच्या भगतसिंग मार्केटमध्ये एका हिंदू मित्रासोबत शॉपिंग करत होत्या, तेव्हा काही लोक तिथे पोहोचले आणि त्यांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. लोक मुलींना चेहरा दाखवायला सांगत असल्याचं व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे. मुलींना प्रश्न विचारण्यात आला की हे कसले मित्र आहेत तुमचे? हिंदूंना मित्र बनवणार का?
@Uppolice अनुरोध है संजीदगी और त्वरित जांच हो, अगर विडिओ सत्य है (हम सत्यता नहीं जानते) तो फिर कठोरतम कार्रवाई हो !
विडिओ मेरठ की भगत सिंह मार्केट का बताया गया है ! साथी युवक के साथ खरीददारी कर रही 2 मुस्लिम युवतियों से मुस्लिम भीड़ ने अभद्रता की, उनके नकाब खींचे! @dgpup pic.twitter.com/1xKZddRlpC
— Parvez Ahmad (@parvezahmadj) May 14, 2023
मुली आणि मुलांसोबत गैरवर्तन –
यानंतर काही लोकांनी जबरदस्तीने मुलींचा नकाब काढला आणि चेहरा दाखवण्यास सांगितले आणि त्याचा व्हिडिओही बनवला. यानंतर त्यांनी तरुणाचीही चौकशी सुरू केली. प्रत्युत्तरात तो तरुण म्हणत आहे की, कृपया माझे ऐका, आम्ही सहकारी कर्मचारी आहोत. यानंतर तेथे उपस्थित लोकांनी तरुणाला धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरून लोक संताप व्यक्त करत आहेत.
मेरठ पोलिसांनी या संपूर्ण वादावर म्हटले आहे की, या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुराव्याच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.