मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय गदारोळात शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या फ्लोअर टेस्टसाठी संपूर्ण आराखडा तयार केला आहे. महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (मविआ) सरकारच्या विरोधात विधानसभेत फ्लोर टेस्टसाठी मी गुरुवारी मुंबईला जाणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने देखील जोरदार तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आमदारांची बैठक घेणार असल्याचं समोर आलं आहे.
दुसरीकडे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या सचिवांना गुरुवारी सकाळी ११ वाजता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारची फ्लोअर टेस्ट घेण्यास सांगितले आहे.
दरम्यान विधीमंडळातील काही सदस्यांवरील अपात्रतेची कारवाई संबंधी याचिका प्रलंबित असताना राज्यपालांनी असे आदेश काढणे बेकायदेशीर असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आमदारांची बैठक घेणार असल्याचे कळते आहे. बहुमत चाचणीवर या बैठकीच चर्चा होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्यासाठी फक्त 24 तासांचा कालावधी देण्यात आल्याने सदर प्रकरणी लवकराच लवकर निकाल द्यावा, अशी विनंतीही कोर्टासमोर करण्यात आली आहे.