अमरावती – दीपाली चव्हाण नावाच्या एका महिला वन अधिकाऱ्याने केलेल्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील उप वन संरक्षक विनोद शिवकुमार याला अटक केली आहे. त्याला नागपुर रेल्वे स्थानकावर ताब्यात घेण्यात आले. यातच वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाच DFO विनोद शिवकुमार यांना धारणी पोलिसांनी न्यायालयात आणलं गेलं.
यातच विनोद शिवकुमार याला पोलिसांकडून त्याला देण्यात आलेल्या या व्हीआयपी ट्रीटमेंटची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. याबाबत मराठी वृत्त वाहिनीनेने दिलेल्या वृत्तानुसार विनोद शिवकुमार याला पोलीस कोठडीत खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देतांना दररोज जेवणासाठी मटनाचा डबाही पुरवला जात आहे. तसेच कोठडीत एक पंखा लावून देण्यात आला आहे. असा आरोपही तेथील भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यानी केला आहे.
या आरोपांमुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाच DFO विनोद शिवकुमार यांना धारणी पोलिसांनी न्यायालयात आणलं गेलं. यावेळी न्यायालयाच्या बाहेर वनविभागातील महिला कर्मचाऱ्यांची शिवकुमार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.